Posts

Nikita Sawant

Image
प्रसारमाध्यमे म्हणजे काय ? ते सांगुन नवसमाज माध्यमांचे वेगळेपण सांगा. तसेच फेसबुक ट्विटर व ब्लॉग विषयी सविस्तर माहिती लिहा. 07 December 2022 निकिता बाळू सावंत  उत्तर  ->           प्रसारमाध्यमे म्हणजे काय ? प्रसारमाध्यमे कशाला म्हणतात ? हे समजून घेण्यासाठी आपल्याला खूप काही माहिती मिळवण्याची किंवा त्याविषयी वाचन करण्याची अजिबात आवश्यकता नाही. कारण प्रसारमाध्यमे ह्या नावातच त्याची व्याख्या आणि त्याचा अर्थ दडलेला आपणास दिसून येतो. फक्त थोड्या चिकित्सक दृष्टीने त्याकडे पाहण्याची आपल्याला आवश्यकता आहे.             प्रसार म्हणजे पसरविणे असा त्याचा अर्थ होतो. आणि माध्यम म्हणजे एखादी गोष्ट करण्यासाठी आपण ज्याचा आधार घेतो त्याला माध्यम म्हणतात. त्याचबरोबर आपण आपल्या भावना, विचार, मनाची काहीही गोष्ट व्यक्त करण्यासाठी आपण वेगवेगळ्या माध्यमांचा ही आधार घेत असतो.            प्रसारमाध्यमांत अनेक माध्यमांचा समावेश होतो जसे की वृत्तपत्र. वृत्तपत्र ह्या प्रसारमाध्यमे माध्यम द्वारे आपल...