Nikita Sawant

प्रसारमाध्यमे म्हणजे काय ? ते सांगुन नवसमाज माध्यमांचे वेगळेपण सांगा. तसेच फेसबुक ट्विटर व ब्लॉग विषयी सविस्तर माहिती लिहा.
07 December 2022
निकिता बाळू सावंत 
उत्तर ->
          प्रसारमाध्यमे म्हणजे काय ? प्रसारमाध्यमे कशाला म्हणतात ? हे समजून घेण्यासाठी आपल्याला खूप काही माहिती मिळवण्याची किंवा त्याविषयी वाचन करण्याची अजिबात आवश्यकता नाही. कारण प्रसारमाध्यमे ह्या नावातच त्याची व्याख्या आणि त्याचा अर्थ दडलेला आपणास दिसून येतो. फक्त थोड्या चिकित्सक दृष्टीने त्याकडे पाहण्याची आपल्याला आवश्यकता आहे. 
           प्रसार म्हणजे पसरविणे असा त्याचा अर्थ होतो. आणि माध्यम म्हणजे एखादी गोष्ट करण्यासाठी आपण ज्याचा आधार घेतो त्याला माध्यम म्हणतात. त्याचबरोबर आपण आपल्या भावना, विचार, मनाची काहीही गोष्ट व्यक्त करण्यासाठी आपण वेगवेगळ्या माध्यमांचा ही आधार घेत असतो. 
          प्रसारमाध्यमांत अनेक माध्यमांचा समावेश होतो जसे की वृत्तपत्र. वृत्तपत्र ह्या प्रसारमाध्यमे माध्यम द्वारे आपल्याला जगात कुठे काय घडले? काय झाले? हे कळते. कुठे नोकरीसाठी जागा निघाल्या आहेत ते जाहिरातीतून कळते. त्याचबरोबर अशी अनेक सामाजिक प्रसारमाध्यमे आहेत ज्याच्या आधारे आपल्याला वेगवेगळे लाभ होतात.  ज्यांचा आपल्या दैनंदिन जीवनात आपल्याला वापर होतो. 
         प्रसारमाध्यमांमुळे आपल्या दैनंदिन जीवनात होणारे कष्ट कमी होतात. आपल्या वेळेची बचत होते. जसे की मोबाईल. मोबाईल जवळ असल्यामुळे आपण कितीही दूर परदेशात असलेल्या व्यक्तीशीही संपर्क साधू शकतो. त्या व्यक्तीशी बोलण्यासाठी आपल्याला तो जिथे आहे तिथे जाण्याची गरज पडत नाही. आपण क्षणात त्या व्यक्तीशी मोबाईलवर बोलु शकतो. 

नवसमाजमाध्यमे -:
                आजच्या काळाचा उल्लेख 'समाजमाध्योमत्तर समाज' असा करायला हरकत नाही. एवढा प्रचंड हस्तक्षेप आणि विलक्षण पगडा मानवी जीवनात समाजमाध्यमांनी निर्माण केलेला आहे. ही वर्तमान जगातील संपर्काची, संवादाची ,अभिव्यक्तीची अतिशय प्रभावी माध्यम ठरली आहेत. मुक्तपणे आपले विचार मांडण्याची हक्काची स्पेस एक प्रकारचा खुल व्यासपीठच. ही सामाजिक माध्यम सामन्य माणसांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याला अधिक ताकद बहाल करणारी ठरली आहे. 
                या सर्व माध्यमांचा वापर 'लोकल टु ग्लोबल ' वाढत चाललेला आहे. इथे माणसे वेगवेगळ्या अॅपद्वारे एकमेकांशी जोडली गेलीत. या माध्यमांज स्वरूप काहीस बहुरंगी आहे. या माध्यमांवर केवळ आजचीच पिढी नाही,तर मागच्या - पुढच्या अनेक पिढ्या आकर्षित झाल्या आहेत, आणि ज्ञानाच विकेंद्रीकरण करायला जशी मदतगार ठरलीत, तशीच संवर्धनासाठीही उपयुक्त ठरत आहेत.  
         इंटरनेटवर उपलब्ध असणारा, विविध व्यक्तींशी संपर्क साधू देणारा व ते जपू देणारा मंच म्हणजे सोशल नेटवर्क सेवा. सोशल नेटवर्क अथवा सामाजिक जाळे म्हणजे असे गट जिथे समान विचारांची, सारख्या आवडीनिवडीची माणसे एकत्र येतात. ह्या संज्ञेत जरी प्रत्यक्ष भेट अथवा थेट संवाद अपेक्षित असला तरी ही संज्ञा इंटरनेटवरील सेवेसही लागु पडते. 
फेसबुक :
        फेसबुक एक अतिशय लोकप्रिय आणि विनामूल्य सोशल नेटवर्किंग वेबसाईट आहे. यामधे आपण अकाऊंट तयार करून फोटो, व्हिडिओ, संदेश पाठवू शकतो. तसेच आपल्या सहकारी, मित्र, कुटुंब यांच्या संपर्कात राहू शकतो. फेसबुक आपल्याला वर्षानुवर्षे न भेटलेल्या लोकांशी परत संपर्क साधण्याची संधी देते. फेसबुक हे जवळजवळ 37 वेगवेगळ्या भाषांमध्ये उपलब्ध आहे. 
         फेसबुकचा शोध 4 फेब्रुवारी 2004 रोजी मार्क इलेट जुकर बघ यांनी लावला .आजच्या काळात अडीच अब्ज होऊन अधिक लोक फेसबुक मध्ये नोंदणीकृत आहे याचा अर्थ असा आहे की जगातील प्रत्येक सातवा माणूस फेसबुक वापरतो .
        आजच्या जगाचा विचार केला तर आजचे जग खूप सुपरफास्ट झाले आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत लोकांना इतरांकडे मुळीच वेळ नसतो पण फेसबुक एक असे माध्यम आहे जे सहजपणे एकमेकांशी कोठूनही आणि कसाही संपर्क साधू शकतो.

ट्विटर :

                ट्विटरच्या साह्याने अगदी कमी शब्दांत प्रतिक्रिया व्यक्त करता येतात किंवा संवाद साधता येतो या मजकुराला ट्विट असे म्हणतात. ट्विटस ही 280 अक्षरापर्यंतची लिखित पोस्ट असते.लेखक ही पोस्ट आपल्या पानावर प्रकाशित करतो आणि ती कोणीही वाचू शकतो वेबसाईट ,लघु संदेश सेवा किंवा बाह्य अनुपयोगांच्या माध्यमातून ट्वीट पाठवता येते आणि तिचे उत्तर मिळवता येते.
                ट्विटर सेवा ही 2006 मध्ये  इंटरनेटवर मध्ये सुरू झाली आणि सुरू झाल्यावर तंत्रप्रेमी लोकांत विशेषता युवा वर्गात खूप लोकप्रिय झाली. ट्विटरच्या मदतीने आपण आपल्या मित्र आणि नातेवाईकांशी संपर्कात राहू शकतो. ट्विटर हे राज्यातील कोणतीही माहिती मिळवण्यासाठी एक सोपे साधन आहे ट्विटर हे प्रचार करण्यासाठी एक उत्तम माध्यम आहे.
 
ब्लॉक :
          एखाद्या गोष्टीवर परिपूर्ण माहिती देणे किंवा त्या विषयाची माहिती ज्ञात असणे या सगळ्या गोष्टी एक वेबसाईट बनवून यूजर साठी उपलब्ध करून देणे याला ब्लॉग म्हणतात. विकिपीडिया साईट वर लोक माहिती देऊन लोकांची क्वेरी सॉल करत असतात वर लोक माहिती देतात आणि त्याची एक लिंक आपल्या वेबसाईटला जोडतात ही वेबसाईट त्यांची पर्सनल ब्लॉग असते.
           जगामध्ये अशा काही गोष्टी आहेत ज्यांची माहिती अद्याप पर्यंत झालेली नाही या माहितीची संपूर्णपणे योग्य पद्धतीने माहिती देणे यासाठी ब्लॉकची रचना करण्यात आलेली आहेत. ब्लॉक तयार करण्याचे दुसरे उद्दिष्ट म्हणजे ब्लॉक तयार करून तुम्ही पैसे सुद्धा कमवू शकता ब्लॉग हा फक्त तुम्हाला पैसे मिळवून देत नाही तर तुम्हाला यामुळे लोकप्रियता सुद्धा मिळते काही मोठे मोठे युट्युबर आणि ब्लॉगर आता सेलिब्रिटी झालेले आहेत.